Ticker

6/recent/ticker-posts

कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण तोंडाने उघडणे आले अंगलट


 विषबाधेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू, किन्हाळा येथील घटना 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- स्वमालकीच्या धान पिकावर फवारणी साठी कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण तोंडाने उघडल्याने शेतकऱ्यास विषबाधा होऊन उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी(ता.८मे) रोजी उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव सुरेश महादेव अलोने(६०) रा. किन्हाळा, तालुका लाखांदूर असे आहे. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                 सुरेश अलोने हे अल्पभूधारक शेतकरी असून किन्हाळा शेतशिवारात त्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि झाला असेल तर व्यवस्थित व्हावा. या करिता ३० एप्रिल रोजी सदर शेतकरी शेतात कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी गेला होता. कीटकनाशकाच्या डब्याचे हाताने झाकण उघडण्याचा प्रयत्न केला असता उघडले नसल्याने तोंडाने झाकण उघडण्याचे प्रयत्नात काही प्रमाणात कीटकनाशक शेतकऱ्याच्या तोंडातील गेले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपचारासाठी शेतकरी सुरेश अलोने यांना ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वतीने लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. बाबद माहिती होताच कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण तोंडाने उघडणे आले अंगलट अशा चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या