लाखनी येथील प्रकार
• दखल चित्रा न्युज च्या वृत्ताची
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी शहराला मध्यभागातून विभाजित करणाऱ्या उड्डाण पुलाखालील महामार्गावर ओबडधोबड गतिरोधक तयार करण्यात आले. उड्डाण पुलाचे तांत्रिक दोषामुळे वाहतूक उड्डाण पुलाखालून वळविण्यात आल्यास वाहन चालकांना गतिरोधक दिसत नसल्यामुळे अपघाताचे मुख्य कारण बनत असून नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. असे चित्रा न्युज च्या १८ मे चे वृत्त "उड्डाण पुलाखालील गतिरोधक ठरताहेत नागरिकांसाठी कर्दनकाळ" या शीर्षकाखाली प्रकाशित होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जेएमसी कंपनी खडबडून जागी झाली व उड्डाण पूलाखालील ओबडधोबड असलेले गतिरोधक काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस वाढती वाहतूक लक्षात घेता लाखनी शहरात सुसाट येणारी वाहने व त्यामुळे होणारे अपघात त्यामुळे गतिरोधक असणे आवश्यक आहे. गतिरोधकाचा योग्य तो नमुना असून त्या नमुन्यात असणे आवश्यक आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंपनीने ओबडधोबड पद्धतीने गतिरोधक तयार केल्यामुळे खरंच याच नमुन्यात गतिरोधक असतात का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गतिरोधक तयार केलेल्या ठिकाणी कोणतीही खूण नाही तसेच गतिरोधक दिसतील असे कोणतेही पेंट लावलेले नाही. त्यामुळे सुसाट येणारी वाहने या गतिरोधकांमुळे सामोरच्या वाहनावर धडकतात. तर स्थानिक नागरिकांना गतिरोधक आहे हे माहीत असल्याने ते आपली वाहने योग्य पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मागेहून येणाऱ्या वाहनाला त्या गतिरोधकाची कल्पना नसल्यामुळे ते सुसाट पद्धतीने वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरतात. त्यातच अनेकांना जीव गमवावा लागून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) राजमार्ग व बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केसलवाडा/वाघ फाटा ते स्मशानभूमी लाखनी पर्यंत अंदाजे अडीच किलोमीटर उड्डाण पुलाचे जेएमसी कंपनीद्वारा बांधकाम करण्यात आले. वाहतूक सुरू झाल्यानंतर काही पिल्लर वरून वाहने जातांना कर्णकर्कश आवाज येऊ लागल्याने तांत्रिक दोष असल्याचे बांधकाम कंपनीचे निदर्शनास असल्याने काही काळ उड्डाण पुल वाहतुकीस बंद करून तांत्रिक दोष निवारण करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही. सध्याही तीच परिस्थिती असल्यामुळे उड्डाण पूल वाहतुकीस बंद करून वाहतूक उड्डाण पुलाखालून वळविण्यासाठी ठिकठिकाणी ओबडधोबड गतिरोधक निर्माण करण्यात आल्याने गतिरोधकावरून दुचाकी जातांना किरकोळ अपघात किंवा दुचाकी चालकांना कमरेचा त्रास होत असल्याचे चित्र परिसरात दिसत असल्याचे चित्रा न्युज मध्ये वृत्त प्रकाशित होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएमसी कंपनीने शुक्रवार(ता.३१मे) पासून ओबडधोबड गतिरोधक काढण्याचे काम सुरू केले आहे.
0 टिप्पण्या