• शिवणी/मोगरा येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाने बहिणीसोबत तोंडातोंडी व शिवीगाळ तथा काठीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना गुरुवार(ता.३०मे) रोजी ११:०० वाजता दरम्यान शिवणी/मोगरा येथे उघडकीस आली. जखमी बहिणीचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी भावावर गुन्हा दाखल केला असून जखमी बहिणीचे नाव कुमारी पूजा पृथ्वीराज बोरकर(२०) रा. शिवणी तर आरोपी भावाचे नाव अंकित पृथ्वीराज बोरकर(३०) रा. शिवणी/मोगरा, तालुका लाखनी असे आहे. पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत.
यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे सख्खे भाऊ बहिण असून भाऊ मद्यपी आहे. गुरुवारी बहीण आपल्या खोलीत बसली असताना भाऊ बहिणीजवळ येऊन बसला तेव्हा तिने भावाला तू दारू पिऊन आहेस त्यामुळे माझे जवळ बसू नको. असे बोलली असता भावाने बहिणीसोबत तोंडातोंडी भांडण करुन शिवीगाळ व ढकलढुकल केले. तथा काठीने पाठ, कंबर व डोक्यावर मागच्या बाजूला मारल्याने डोक्यातून रक्त निघत असल्याने बहीण आईसह उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे गेली. उपचारानंतर लाखनी पोलिस ठाणे गाठून भाऊ नेहमी झगडा भांडण व शिवीगाळ करुन मारण्या-पिटण्याची धमकी देत असल्याचे जखमी बहिणीचे फिर्यादीवरून तथा वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी अंकित बोरकर याचे विरुद्ध अपराध क्रमांक २०१/२०२४ कलम ३२४, ५०४, ५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या