• महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये यांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरवठादारामार्फत मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी केंद्रातून पुरविण्यात येणाऱ्या घरपोच आहार(टीएचआर) मध्ये बदल करण्यात यावा. तसेच पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी. या करिता भंडारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती स्वाती नरेंद्र वाघाये यांनी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त यांचेशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांचेकडून काय कारवाई केली जाते. याकडे जिल्हावासियांसह लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
कुपोषणावर मात करता यावी. या करिता भंडारा जिल्ह्यात कार्यरत अंगणवाडी केंद्रामधील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकं गरोदर माता व स्तनदा माता यांना जानेवारी २०२४ पासून घरपोच आहार(टीएचआर) मध्ये मुंगडाळ खिचडी प्रिमिक्स, तुरडाळ खिचडी प्रिमिक्स तसेच मल्टीमिक्स सिरिल्स अँड प्रोटीन्स आणि मिलेट बीड सिरिल्स अँड प्रोटीन्स इत्यादी पूरक पोषण आहाराचा पॅकेट चे माध्यमातून आपणाकडून कंत्राटदारामार्फत अंगणवाडी केंद्र स्तरावर पुरवठा करण्यात येतो. असे महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये यांनी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव तथा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
रेंगेपार/कोहळी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १ व २ मध्ये पुरवठादारामार्फत मुदतबाह्य असलेला घरपोच आहार(टीएचआर) पुरवठा अंगणवाडी केंद्र स्तरावर झाला आहे. सदर पूरक पोषण आहार अंगणवाडी सेविका मार्फत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला असून जागरूक पालकांमुळे सदर धक्कादायक बाब निदर्शनास आलेली आहे. लाभार्थ्यांना शासना मार्फत उत्तम दर्जाचा व पोषण युक्त आहार(टीएचआर) चा पुरवठा करणे आवश्यक असताना संबंधित कंत्राटदारामार्फत मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे महिला व बालकल्याण सभापती स्वाती नरेंद्र वाघाये यांचे म्हणणें आहे.
सध्य स्थितीत पुरवठा होत असलेला घरपोच पोषण आहार(टीएचआर) हा निकृष्ट दर्जाचा असल्याबाबद जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांकडून महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये यांचेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. भंडारा जिल्ह्यात पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराची चौकशी करून पुरवठादाराचे काम रद्द करून कारवाई करण्यात यावी. तसेच पूर्वीप्रमाणे कच्चे धान्याचा अंगणवाडी केंद्र स्तरावर पुरवठा करण्यात यावा. या करिता महिला व बालकल्याण सभापती स्वाती नरेंद्र वाघाये यांनी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त यांचेशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांचेकडून काय कारवाई केली जाते. याकडे जिल्हावासियांसह लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या