• मंगेश कृषी केंद्र पहेला चा अभिनव उपक्रम
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मंगेश कृषी केंद्र पहिला कडून अंकुर शिड्स चे ९ हजार ९०० रुपयाच्या खरेदीवर शेतकऱ्यांना १ कूपन देऊन शेतकरी सन्मान लक्की ड्रॉ नुकताच काढण्यात आला. विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या सह कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, प्रमुख अतिथी अंकुर शिड्स चे झोनल मॅनेजर ढोके, सरपंच मंगला ठवकर, अंकुर शिड्स नागपूर चे गौतम, पोलिस पाटील चंद्रशेखर खराबे, भंडारा आरबीआय चे योगेश बनसोड, रुपचंद जनबंधू, मिंशी चे माजी सरपंच पुष्पराज लांडगे, प्रगतिशील शेतकरी योगराज येलमुले, नत्थु लुटे, विनोद भोयर यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना अंकुर शिड्स चे झोनल मॅनेजर ढोके यांनी सांगितले की अंकुर शिड्स कडून जिल्ह्यात प्रथमच कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शुद्ध बियाणे निवडून अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन केले. ते मंगेश कृषी केंद्र पहेला येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मंगेश कृषी केंद्राचे संचालक मंगेश जनबंधू यांनी आपल्या कमाईचा थोडा हिस्सा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी खर्च करावा. ही संकल्पना त्यांचे मनात आल्याने त्यांनी ९ हजार ९०० रुपयाचे खरेदीवर शेतकऱ्यांना कूपन दिले होते. नुकताच लक्की ड्रॉ काढण्यात आला. त्यात विजेत्यांना ५५ इंच टि.व्ही., फ्रिज, कुलर, मिक्सर मशीन, होम थीएटर असे एकूण १५१ पारितोषिक विजेत्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्वप्नील बनसोड तर उपस्थितांचे आभार यशवंत गवरे यांनी मानले. जिल्ह्यात शेतकरी सन्मानपर कार्यक्रम तसेच अंकुर शिड्स कडून पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. अंकुर शिड्स आणि मंगेश कृषी केंद्राकडून सर्व शेतकऱ्यांचे समाधान करण्यात आले असल्याचे मंगेश जनबंधू यांनी सांगितले.


0 टिप्पण्या