Ticker

6/recent/ticker-posts

पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, चोरीच्या गुन्हयांतील ०९ मोटार सायकल हस्तगत केल्या.


 मोईन कादरी हिंगोली 
हिंगोली :-दि.२२.०४.२०२४ रोजी फिर्यादी नामे शंकर तुकाराम शिरयुलवार वय ५० वर्षे व्यवसाय कापड दुकान, रा. मयुर नगर, वसमत ता. वसमत यांनी पोलीस स्टेशन वसमत शहर येथे फिर्याद दिली की, दि.२१.०४.२०२४ रोजी दुपारी ०४.२० वा.सु. सिरशुलवार क्लॉथ स्टोअर, वरामत समोरून माझी होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक एमएच-२६-बीजे-२२४४ ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली. वगैरे फिर्यादवरून पोलीस स्टेशन वसमत शहर ता. वसमत येथे गुरनं. २३७/२०२४ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास सपोउपनि शेख हकीम हे करीत आहेत.

सदर गुन्हयांचे तपासादरम्यान दि.०६.०५.२०२४ रोजी पोउपनि भोसले यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, दोन इसम सत्य नारायण टॉकीज जवळून एक मोटार सायकल संशयीत रित्या घेवुन जात असल्याचे माहीती मिळाल्यावरून मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील, मा. उपविपोअ श्री मारोती थोरात, पोनि श्री. कुंदनकुमार वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मांजरमकर, पोउपनि भोसले, सपोउपनि शेख हकीम, सपोउपनि सोनटक्के, पोह/७०२ पिंटु राठोड, पोह/५७६ गजानन भोपे, पोह/१९९ केशव गारोळे, पोना/९६४ संदिप चव्हाण, पोशि/२६२ बालाजी वडगावे असे माहीती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता तेथे दोन इसम एका मोटार सायकलवर येत असल्याचे दिसल्याने त्यांना यांबवुन त्यांना त्याचे नाव-गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. शेख शादुल शेख खयुम रा. मुशाफिर शहा मोहल्ला, वसमत २. सय्यद इमरान सय्यद फारूख रा. आसार मोहल्ला, वसमत असे सांगितले व त्यांचे कडील मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेउन सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदरची मोटार सायकल सिरसलुवार यांचे कापडाचे दुकानासमोरून चोरी केल्याचे कबुल केल्याने सदरची मोटार सायकल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आली. तसेच त्यांनी आम्ही वसमत शहरात मंगळवार बाजार येथील भेंडे हॉस्पीटल समोरून, मामा चौक जवळील एका घरासमोरून, वसमत शहरातील इतर ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्या आहेत, तसेच नांदेड येथुन एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण ०९ मोटार सायकली किंमती ५,१०,०००/- रू. च्या जप्त करून गुन्हयाचा पुढील तपास सपोउपनि शेख हकीम व सपोउपनि सोनटक्के हे करीत असुन नमुद आरोपीतांनी कोणकोणत्या जिल्हयातुन मोटार सायकली चोरी केल्या आहेत. या संबंधाने पुढील तपास चालु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या