• रोहाचे लाचखोर तलाठी वैभव जाधव यांना अटक
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- तक्रारदाराचा रेती वाहतूक करतांना ११ मार्च २०२४ रोजी तलाठी वैभव जनार्धन जाधव यांनी ट्रॅक्टर पकडला व २५ हजाराची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने बुधवार(ता.८मे) रोजी सापळा कारवाई करण्यात आली. पण तलठ्यास संशय आल्याने लाच स्वीकारली नाही. वृत्त लिहीपर्यंत मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचखोर तलाठ्यास एसीबीने ताब्यात घेतले आहे.
२३ वर्षीय युवा तक्रादाराकडे ट्रॅक्टर असून ते वाळू, गिट्टी, सिमेंट इत्यादी साहित्याची वाहतूक करतात. ११ मार्च २०२४ रोजी वाळूची वाहतूक करतांना तलाठी वैभव जनार्धन जाधव यांनी पकडला व ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने सध्या माझेकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने तुझ्यावर विश्वास ठेऊन ट्रॅक्टर सोडतो. पण उद्या पैसे आणून दे. असे तलाठ्याने तक्रारदारास सांगितले. तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने १२ मार्च २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार दिली. त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी वैभव जाधव याने पंचासमक्ष तडजोडी अंती २० हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने ८ मे २०२४ रोजी सापळा कारवाईचे आयोजन करून तक्रारदार यांना रक्कम घेऊन रवाना केले. पण तलाठ्यास संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही. वृत्त लिही पर्यंत पोलिस ठाणे मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तलाठी वैभव जाधव यास ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकनीकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात भंडारा चे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांचे नेतृत्वात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, पोलिस नायक अतुल मेश्राम, नरेंद लाखडे, पोलिस शिपाई विवेक रणदिवे, चालक पोलिस शिपाई राहुल राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोना शिलपेंद्र मेश्राम, पोलिस शिपाई चेतन पोटे, मयूर सिंगणजुडे, महिला पोलिस शिपाई अभिलाषा गजभिये यांनी सहकार्य केले.
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन(चौकट)*
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम(एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांचेशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०७१८४-२५२६-६१ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.


0 टिप्पण्या