अर्पित वाहोणे चित्रा न्यूज वर्धा
यवतमाळ दिनांक 05 मे 2024 रोजी स्थानिक यवतमाळ येथील लॉर्ड बुद्धा ऑफिस येथील सभागृहामध्ये समता सैनिक दलाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे संघटक मार्शल अनिकेत उबाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य सहसंघटक मार्शल सुनील मेश्राम, महाराष्ट्र राज्याचे बौद्धिक प्रमुख मार्शल नरेश ताकसांडे, महाराष्ट्र महिला विंग्सच्या संघटीका डॉक्टर पूनम ढाले तथा सहसंघटिका डॉक्टर कल्पनाताई दातार, मार्शल डॉ.भास्कर कांबळे (वरीष्ठ कार्यकर्ता, माजी बौद्धिक प्रमुख, महाराष्ट्र)
समर्पित कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त व वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे त्याच बरोबर मार्शल हेमंत गायकवाड राज्य नियोजन प्रमुख, राज्याचे समन्वयक मुकेश गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .
यवतमाळ जिल्हा युनिट तर्फे नवनियुक्त पदाधिकारी यांचे बोधीवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. दोन सत्रामध्ये चाललेल्या या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये स्थानिक पातळीवर मेळावा घेणे समर कॅम्प घेणे, आंबेडकरी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करणे तथा आंबेडकरी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यावर विविध मार्शलकडून मत मागविण्यात आले. आणि चर्चा करण्यात आली.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा एक बौद्धिक शिबिर राबविण्यात करिता नियोजन करण्याचे ठरले.
दुसऱ्या सत्रामध्ये संघटनेच्या आर्थिक नियोजनावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक संघटन शाखेने आपले आर्थिक नियोजन कशा प्रकारे केले पाहिजे? संघटनेकडे आर्थिक नियोजन असले पाहिजे. आर्थिक फंड कसा उभारावा? यावर सर्वांची मते घेण्यात आली आणि सांगोपांग चर्चा करून काही ठराव घेण्यात आले.
संघटनेसाठी प्रचारार्थ प्रवास करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आर्थिक नियोजन राज्य संघटनेद्वारा करावे. यावर सर्वांनुमते एकमताने चर्चा करण्यात आली.
स्थानिक वर्तमान परिस्थितीतील विषयावरती संघटनेने आंदोलन करणे ,निवेदने देणे, शेतीविषयक, शैक्षणिक, सामाजिक अशा घडामोडी वरती लक्ष ठेवून संघटनेने कार्यास तत्पर राहणे अशा विषयावर चर्चा करण्यात आली.
संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरज ढाले आणि वरिष्ठ मार्गदर्शक मार्शल विलास नरांजे सर यांनी संघटने प्रति आपली जबाबदारी काय असावी? यावर मोलाचा प्रकाश टाकला .
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या जिल्हा संघटक ,सहसंघटक तथा सर्व शाखांचे पदाधिकारी यांनी आपापल्या शाखेमध्ये सुरू असलेले विविध समाज उपयोगी उपक्रम आणि कार्याची माहिती सभेसमोर सादर केली. ज्यामध्ये मार्शल मंगेश तायडे, मार्शल सुशील मेश्राम, मार्शल धनराज पुणेकर, मार्शल आनंद दुबे, मार्शल ऍड. प्रदीप रामटेके, मार्शल अस्मिता लोखंडे, मार्शल विशाखा मेश्राम, मार्शल वीणा नरांजे, मार्शल प्रीती आष्टेकर
राज्याकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि त्यांच्या पदभार देण्यात आला आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आले .
या सभेकरिता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून सर्व शाखेचे पदाधिकारी यांची हजेरी होती. अतिशय शिस्तीमध्ये चाललेल्या या सभेचे संचालन यवतमाळ जिल्हा संघटक मार्शल अशोक खरतडे यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्ह्याचे प्रचारक मार्शल रितेश भगत सर आणि बौद्धिक प्रमुख युवराज डोमे यांनी केले. सभेकरिता जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. येथील लॉर्ड बुद्धा ऑफिस येथील सभागृहामध्ये समता सैनिक दलाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे संघटक मार्शल अनिकेत उबाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य सहसंघटक मार्शल सुनील मेश्राम, महाराष्ट्र राज्याचे बौद्धिक प्रमुख मार्शल नरेश ताकसांडे, महाराष्ट्र महिला विंग्सच्या संघटीका डॉक्टर पूनम ढाले तथा सहसंघटिका डॉक्टर कल्पनाताई दातार, मार्शल डॉ.भास्कर कांबळे (वरीष्ठ कार्यकर्ता, माजी बौद्धिक प्रमुख, महाराष्ट्र)
समर्पित कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त व वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे त्याच बरोबर मार्शल हेमंत गायकवाड राज्य नियोजन प्रमुख, राज्याचे समन्वयक मुकेश गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .
यवतमाळ जिल्हा युनिट तर्फे नवनियुक्त पदाधिकारी यांचे बोधीवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. दोन सत्रामध्ये चाललेल्या या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.



0 टिप्पण्या