दिशा पिंकी शेख
आंधळेपणाच सोंग घेणाऱ्या लोकांमध्ये नजर देणारा माणूस हाय बाळासाहेब...
उडू पाहणाऱ्यांसाठी आभाळ व्हायची तयारी ठेवणारा माणूस हाय बाळासाहेब...
मातीतलं आणि जातीतलं कसून सुपीक बनवायचं कसब चांगलं कळतं त्यास्नी...
बाबासाहेबांन पीकविलेला मळा आणि त्या मळ्याच राखंदार हाय बाळासाहेब...
हात धरून डाग दाखवायची हिंमत नाही बघा कुणात,
एवढं निर्मळ हायत बाळासाहेब...
चिकित्सा, तत्वनिष्ठा, वंश, वारसा ह्या समद्या दुधारी तलवारींना झेलत इथल्या आलुतेदार, बलुतेदार, अठरापगड जाती आणि लिंग भेदाच्या भीतीमध्ये कोंबलेल्या पिढ्यांना मोकळ करण्याची धडपड आहे बघा बाळासाहेब...
प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाचा असो नाहीतर मुसलमानांचा अधिकारांचा, बायांवर होणारे अन्याय अत्याचार असो किंवा भ्रष्ट नेत्यांना घालायचा कासरा असो बाळासाहेब म्होर असतात सरकारची गचांडी धरायला...
लोकासनी लय इमानदारी झेपत नाही बघा,
ते म्हणतात बाळासाहेबांनी थोडं मोल्ड झाल पाहिजे.
सत्तेत वाटेकरी होण्यासाठी प्रस्थापितांशी थोड गोड झालं पाहिजे...
बाळासाहेब नावाचं वादळ न वाकतंय, ना वाकु देतय कुणाला.
बाळासाहेबा संग धडका घ्यायला इमानदारीच दूध पेऊन यावं लागतयं बघा...
लाचारीत पिढ्या गेलेल्यांना लीडर बनवण्याचा कारखाना हाय मव्हा बाळासाहेब...
माझा नेता लाचारीने कुणापुढे वाकत नाही म्हणून मी त्याचा वाढदिवस माझा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करते...
माझ्या स्वाभिमानानं मला हे शिकवलयं. हरलो, तरी बेहत्तर पण लढताना स्वाभिमान कोणाच्या पायावर ठेवायचा नाही.
माझ्या स्वाभिमानाचे रक्षक म्हणून माझी ढाल होवून उभे राहणार बाळासाहेब तुम्ही शतायुषी व्हा !
― दिशा पिंकी शेख
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मंगल कामना.....


0 टिप्पण्या