Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात "स्वाभिमानी दिन" साजरा!

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
अकोला:-नैतिकता आणि  स्वाभिमानी बाणा जपणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने अकोल्यातील पक्ष कार्यालयात "स्वाभिमान दिन" म्हणून साजरा करण्यात आला.

तसेच अक्षय तृतीयतेच्या निमित्ताने योगायोग साधत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत विविध सामाजिक उपक्रम साजरे करत वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यानिमित्ताने केक कापून खाऊ वाटप करण्यात आला. तसेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, गरिबांना खाऊ वाटप इत्यादी सामाजिक उपक्रम राबवून विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या