Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी दिवसानिमित्त मालेगावात रक्तदान शिबिर


रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
मालेगाव:-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडी मालेगाव शहर युवा अध्यक्ष सचिन अहिरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  

या शिबिराला शहरातील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ज्या नागरिकांनी शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले, त्यांना वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते आनंद आढाव, राजु ढिवरे, संतोष शिंदे, गौतम अहिरे, कैलास लोहार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या