Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू



उसगाव येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी  येथील पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या उसगाव येघे वादळामुळे शेतातील विद्युत तार खाली पडल्याने तार ठेवत असताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार(ता.८) दुपारचे सुमारास उघडकीस आली. नामदेव बिसेन यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतकाचे नाव नाजूक बलीराम बिसेन(४२) रा. उसगाव, तालुका साकोली असे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे तपास करीत आहेत. 
                नाजूक बिसेन अल्पभूधारक शेतकरी असून शेतात सिंचनासाठी सोय केली असल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा केला आहे. बुधवारी उसगाव आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस आला होता. नाजूक गवत आणण्याकरिता शेतात गेला असता वदळामुळे त्याचे शेतात असलेली विजेची वायर खाली पडलेली दिसल्याने उचलून बांबूचे काठीवर ठेवत असताना चालू वीज प्रवाहाचे तार त्याचे शरीराला स्पर्श होऊन काखेत अडकल्याने करंट लागून मरण पावल्याचे मोठा भाऊ नामदेव बिसेन यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव परीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मर्ग क्रमांक १५/२०२४ कलम १७४ सीआरपीसी नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे तपास करीत असून मन मिळावू नाजूक च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या