Ticker

6/recent/ticker-posts

सामेवाडा येथे मग्रारोहयो मजुरांची आरोग्य तपासणी


जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांचा पुढाकार

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील आणि गरीब कुटुंबातील मजूर वर्ग कामाचे शोधात असतो. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही. आरोग्याकडे दुर्लक्षामुळे छोट्या छोट्या आजारांचे मोठ्या आजारात रूपांतर होऊन वेळ प्रसंगी जीवही गमावण्याची वेळ मजुरांवर येते. यावर मात करता यावी. याकरिता जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांचे पुढाकाराने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामेवाडा येथे सुरू असलेल्या बंधाऱ्यातून गाळ काढणे कामावरील मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात १५० मजुरांनी लाभ घेतला. 
                   जिल्हा परिषद सदस्या मनीषा निंबार्ते यांचे पुढाकाराने सामेवाडा येथील बंधाऱ्यातून गाळ काढणे कामावर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच शालिनी गजभिये, ग्रामसेवक सी.डी. भानारकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता फंदे, सरिता मडामे, प्रज्ञा लांजेवार यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. त्यात रक्त तपासणी, उच्च रक्तदाब(बीपी) आणि मधुमेह(शुगर) तपासणी करण्यात आली. आरोग्य सेविका पदम गिलवार, प्रयोगशाळा सहाय्यक अनिता परीहार, मेघा शेंडे तसेच आशा स्वयंसेविका वैशाली उके यांनी आरोग्य तपासणी केली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बंधाऱ्यातील गाळ काढणे कामावरील १५० महिला व पुरुष मजुरांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोजगार सेवक रामू उके यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी किशोर खोब्रागडे, प्रफुल्ल गिरेपुंजे, धम्मशिल मेश्राम, हेमंत बोळने, श्रीकृष्ण खोब्रागडे, संदीप बोळने, पवन भस्मे, राजेंद्र लांजेवार यांनी अथक परिश्रम तथा सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या