Ticker

6/recent/ticker-posts

हाळी हंडरगुळीत ना-बालक बनले चालक हाळी — हंडरगुळीत ना-बालक बनले चालक हंडरगुळी मिसरुडं न फुटलेल्या पोरांनी कोणतेही वाहन


अर्पित वाहोणे चित्रा न्युज 

लातूर :-हाळी  हंडरगुळी चालवले,तर त्यांना 100 ₹.दंडाची तरतुद होती.त्यानंतर ,या दंडात पाच पट वाढ करुन 500 ₹.झाली.शहरी भागात वाहतूक पोलिसांनी पकडले तर दंड भरुन चालक=मालक मंडळी निश्चिंत व्हायचे. माञ हंडरगुळी.ता. उदगीर येथे आजवर कुणी पण अशा ना-बालक असलेल्या चालकांवर कारवाई केली नाही.म्हणुन तर येथे मेन रोड सह गल्लोगल्ली ना-बालक सुसाट वेगात व फटाका हाॅर्न वाजवत  स्वत:च्या ताब्यातील गाडी पळवतात.व यामुळे मिशा ही न फुटलेल्या ना— बालक चालकांमुळे अपघात होऊ शकतो.व अशा बालकांना सं. पालकवर्ग सुध्दा मनाई करण्याऐवजी मोठ्या रुबाबात गाडी चालवायची परवानगी देतात. पण आता पालकांनो खबरदार ....! कारण आता मोटार वाहन कायद्यात मोठा बदल झाला असुन,या बदला नुसार कारवाई झाली तर संबंधित चालक (बालक) मंडळींवर रितसर कारवाई तर होणारच.याच बरोबर सं. पालकांना जेल (सासरवाडी) ची हवा खावी लागणार आहे.तेंव्हा पालकांनो वेळीच सावध व्हावा,आणि आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात घालू नका.  मोटार वाहन अधिनियम  मिसरुडं न फुटलेल्या पोरांनी कोणतेही वाहन  विठ्ठल पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या