• सावरी/मुरमाडी ग्रामपंचायतीमधील प्रकार
• सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांचे ग्रामपंचायतीस पत्र
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथील गट क्रमांक १६४/३ च्या आबादी जागेतील काही प्लॉट धारक सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून ग्रामपंचायतीची परवानगी न घेता नवीन बांधकाम करीत असल्यामुळे सदर बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे. या करिता सामाजिक कार्यकर्त्या मंदा घनश्याम गभने यांनी सचिव/सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सावरी यांचेशी पत्र व्यवहार केला असून ग्रामपंचायतीकडून काय कार्यवाही केली जाते याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
सावरी/मुरमाडी येथील गट क्रमांक १६४/३ चे आबादी जागेत पात्र नसलेल्या काही प्लॉट धारकांनी शासनाची दिशाभूल करून मागील ४० वर्षापासून मिळाल्या प्लॉट वर कोणतेही बांधकाम केले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी सदर प्लॉट सरकार जमा करून गरजू व भूमिहीनांना देण्यात यावे. या करिता तहसीलदार लाखनी यांचेकडे पत्र व्यवहार केला होता. या बाबद वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यामुळे काही प्लॉट धारकांनी खाली प्लॉटवर अनधिकृत बांधकाम सुरू केले. पण परवानगी घेतली नसल्यामुळे गैरकायदेशीर आहे. असे मंदा गभने यांनी सरपंच/सचिव ग्रामपंचायत सावरी यांना ३० एप्रिल रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
गट क्रमांक १६४/३ च्या आबादी जागेतील खाली प्लॉट शासनाकडे जमा होतील. या भीतीपोटी तहसील कार्यालय लाखनी कडून परवानगी न घेता किंवा विकास शुल्क न भरता लेआऊट टाकून बांधकाम सुरू करीत आहेत. तर काही प्लॉट धारक सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम करण्याचे तयारीत असून लोकांचा जाण्या येण्याच्या रस्ता बंद करीत आहेत. तलाठी नकाशानुसार दर्शवण्यात आलेला सार्वजनिक रस्ता बंद करून अतिक्रमण करण्यात येऊन सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे. तथा समोर येणाऱ्या कायदेशीर अडचणी व न्यायालयीन कारवाईस ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार राहील. अशा आशयाचे सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी ग्रामपंचायत प्रशासनास पत्र दिले. या आधीही त्यांनी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणाबाबद ४ एप्रिल रोजी पत्र दिले होते. पण ग्रामपंचायतीने कारवाईचे सौजन्य दाखविले नाही. ग्रामपंचायत सावरी ने सार्वजनिक रस्त्यावर होणारे बांधकाम थांबविण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.


0 टिप्पण्या