Ticker

6/recent/ticker-posts

वृद्ध दाम्पत्यास शिवीगाळ करून मारहाण

• गडेगाव येथील घटना 

• पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- जुन्या जागेच्या वादावरून वृद्ध दाम्पत्यास अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवार(ता.२६मे) रोजी सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास गडेगाव येथे घडली. वृद्धाने लाखनी पोलिसांत फिर्याद दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असली तरी वृद्धावर ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचार सुरू असून नाव नत्थु बाबुराव नंदेश्वर(७०) रा. गडेगाव, तालुका लाखनी असे आहे. त्यांनी पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 
                 घरालगत वास्तव्यास असणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीचे इसमासोबत जागेवरून जुना वाद सुरू आहे. रविवारी सायंकाळचे सुमारास वृद्ध दाम्पत्य आपले घरी असताना मद्यधुंद अवस्थेत त्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाने घरात शिरकाव केला आणि शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी वृद्धास मारहाण केली. तसेच तू आमच्या शेजारी नको असे बोलून जीवे मारण्याची धमकीही दिली. तथा हात, पोट व गळ्यावर लाथा-बुक्क्यांनी मारण्याची घटना घडली होती. वृद्धाने पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली असता पोलिसांनी वृद्धाचे ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे वैद्यकिय परीक्षण केले तथा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मारहाणीमुळे वृद्ध जेवण करण्यास असमर्थ ठरल्याने मुलगा मंगेश नंदेश्वर याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली दखलपात्र स्वरूपाचा प्रकार असताना अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. हे अनाकलनीय आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यासह प्रतिबंधक कारवाई केली असली तरी या गुंड प्रवृत्तीच्या इसमाने मंगळवार(ता.२८मे) रोजी पुन्हा अश्लील शिवीगाळ करून भांडण केल्याचे मुलगा मंगेश नंदेश्वर याने सांगितले. या प्रकाराने हे वृद्ध दाम्पत्य भयभीत झाले असून पोलिसांकडून न्याय मिळेल. या अपेक्षेत असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या