पोहरा ते धानला रस्त्यावरील घटना
लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी तालुक्यातील पोहरा–धानला रस्त्याच्या मधोमध ४० वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना शनिवारी(ता. ४) दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव विच्छेरा चिंतामण झलके(४०) रा. धानला/चान्ना, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
मृतक विच्छेरा झलके याने शनिवारी(ता.४) ला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पोहरा–धानला रस्त्याच्या मधोमध विषारी औषध प्राशन केले. हि बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तथा कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविले. उपचारादरम्यान दुपारी ४:०० वाजता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रुग्णालय पोलिस चौकीला देण्यात आली. भंडारा पोलिस ठाण्यात ००/२०२४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा पोलिस ठाण्यातून टपालाव्दारे दस्ताऐवज लाखनी पोलिसांना प्राप्त होताच मर्ग क्रमांक १४/२०२४ अन्वये नोंद घेण्यात आली. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार प्रभा कुलसुंगे तपास करीत आहेत. मन मिळाऊ विच्छेरा झलकेच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या