कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- सर्वसामान्य जनतेच्या अग्रक्रमाने समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे तथा शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरलेले. दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हा महासचिव तथा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ह्या संघटनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे वतीने त्यांचे निवासस्थानी मंगळवारी(ता.७) दुपारी २:३० वाजता बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. केक कापून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष डी. वाय. बडोले, ओबीसी आघाडीचे साकोली तालुकाध्यक्ष सुरेश मेश्राम, तालुका उपाध्यक्ष नितीन इलमकर आणि कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या