• डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- कोका वन्यजीव अभयारण्यातून अड्याळ वन परिक्षेत्रात जाण्याचा गडेगाव लाकूड आगार समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) ओलांडून जाण्याचा भ्रमण मार्ग आहे. रात्रीचे सुमारास महामार्ग ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेने हिंस्त्र श्वापदांसह अनेक तृणभक्षी प्राणीही मृत्युमुखी पडलेले आहेत. वन्य प्राण्यांना सुरक्षित मार्गक्रमण करण्यासाठी लाकूड आगार गडेगाव परिसरात गतिरोधक किंवा उड्डाण पुल आणि वेग मर्यादा चे सूचना फलक लावण्यात यावे. अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम द्वारा होत आहे.
लाखनी तालुक्याचे उत्तरेस कोका वन्यजीव आणि नागझिरा अभयारण्य आहे. गडेगाव लाकुड आगारालगत वन परिक्षेत्र लाखनी, भंडारा व अड्याळ च्या सीमा भीडल्या असून अड्याळ वनक्षेत्रानंतर उमरेड करांडला अभयारण्य आहे. कोका वन्यजीव अभयारण्यातील प्राणी चिखलाबोडी, गडेगाव जंगलातून महामार्ग ओलांडून अड्याळ वनक्षेत्रात जात असतात. रात्रीचे सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत बिबट, रानडुक्कर, हरीण, सांबर असे अनेक प्रजातीचे वन्य प्राणी मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा कसलीही उपाययोजना केली गेली नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमसह वन्यजीव प्रेमीत संतापाची लाट उसळली आहे.
वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे राष्ट्रीय महामार्ग ५३(जुना ६) ओलांडता यावा. या करिता महामार्ग प्राधिकरणाने गडेगाव लाकूड आगार परिसरात गतिरोधक अथवा उड्डाण पूल तयार करावा. त्याचप्रमाणे वन विभागाने वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग असल्याचे ठिकठिकाणी सूचना फलक लावावे व महामार्ग पोलिस मदत केंद्रातर्फे वाहनांची वेगमर्यादा प्रती तास २० किलोमीटर ठेवण्यात यावी. असे महामार्गाचे कडेला दर्शनी भागात सूचना फलक लावावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम, प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे, लाखनी तालुकाध्यक्ष अरविंद रामटेके, ओबीसी आघाडी अध्यक्ष सुरेश मेश्राम, उपाध्यक्ष अरविंद कठाने, सोनू राऊत, विद्यार्थी आघाडी चे साहील खोब्रागडे, नगर सेवक प्रदीप तीतिरमारे, ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश चोले, सामाजिक कार्यकर्ता जीवन बावनकुळे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या