Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२५ साठी ऑनलाईन अर्ज मागविले

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर:- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार- ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

            हे अर्ज (https://awards.gov.in ) या संकेतस्थळाला मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विाकरले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ५ पेक्षा अधिक व ३१ जुलै २०२४ रोजी १८ वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांसकृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शोर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. राज्यातून अशा प्रकारच्या मुलांचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त यांनी केले आहे.
००००००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या