निरीक्षक म्हणून पालघरच्या दौऱ्यावर असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा...
राकेश आसोले चित्रा न्युज
गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे सध्या निवडणूक निरिक्षक म्हणून पक्षाच्या वतीने मुंबईतील पालघर लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळत आहेत. यानिमित्ताने महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी मंगळवारी चिमूर विधानसभेतील प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या नियोजनासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बंटी भांगडिया यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्याच टप्प्यात गडचिरोली - चिमूर क्षेत्रासाठी १९ एप्रिलला मतदान झाल्यानंतर पक्षाने माझ्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर या लोकसभा मतदार संघामधील महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे, डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटिल, डॉ.भारतीताई पवार, हिना गावित यांच्यासह डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या प्रचारासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे मला आपल्या क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन आभार मानता आले नाही असे यावेळी खा.अशोक नेते म्हणाले. तरिपण आज मुंबईतील पालघर मतदार संघाच्या दौऱ्यात चिमूर विधानसभेतील भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट होऊन सविस्तर चर्चा करता आली त्याबद्दल खा.नेते यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
विशेषतः चिमूर विधानसभेचे आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी घेतलेल्या अथक परिश्रमासाठी खा.नेते यांनी विशेष आभार मानले.
यावेळी माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, किसान आघाडीचे सरचिटणीस रमेशजी भुरसे, चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, चिमूर तालुकाध्यक्ष राजू पा.झाडे, नागभिड तालुकाध्यक्ष संतोष रडके, ओबिसी आघाडीचे एकनाथ थुटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळू पिसे, जेष्ठ नेते रमेश पा.बोरकर, जेष्ठ नेते विजय ठाकरे, युवा प्रमुख प्रफुल लांबट, कृ.उ.बा.सभापती आवेश पठान, जि.प.प्रमुख अविनाश बोरोकर, प्रदीप मेश्राम, प्रफुल्ल कोलते, विलास कोराम उपस्थित होते.


0 टिप्पण्या