संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :- पिंपळगाव येथे पितृछाया क्लिनिक तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.विवेक बहेकार यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ.चंद्रकांत निंबार्ते,गोवर्धनजी कोरे,राजू शिवणकर, डी.जी.रंगारी,प्रवीण दोनोडे, शालिनी दोनोडे, सुषमा कोरे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील डॉ. विजय कुंघाटकर,डॉ.स्वप्निल शामकुवर,राजू नागदेवे,सना शेख,लोकेश गोटेफोडे,लोकेश क्षिरसागर,रेशीम हाडगे,देवेंद्र मडावी,गुरूदेव बावनकुळे यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सायली दोनोडे यांनी आपल्या मुलीच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ.अतुल दोनोडे यांनी तर आभार पायल शिवणकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीष्म लांडगे,निलेश शिवणकर,मुकेश मासुरकर,प्रफुल दोनोडे,धनंजय कापगते,अमोल परशुरामकर,वरुण पर्वते,चंद्रशेखर कापगते,महेश कोरे,प्रशांत कठाने,शैलेश कमाने, किरण शिवणकर, यशपाल कापगते,सुनिल कोरे ,चैतन्य लुटे,संदीप कमाने,स्वाती बहेकार,पायल शिवणकर,अश्विनी हलमारे इ.रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.


0 टिप्पण्या