Ticker

6/recent/ticker-posts

उष्माघाताने मृत्यू पावलेल्या चे कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी

• सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- नवतपात गुरुवारी स्वमालकीची पाळीव जनावरे शेतशिवारात चारावयास गेलेल्या पशूपालक भास्कर दूधराम तरारे(५६) रा. मांढळ यांचा उपचारादरम्यान सामान्य रुग्णालय भंडारा येथे उष्माघाताने मृत्यू झाला. घरातील ते कमावते व्यक्ती असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे. 
                    बि-बियाणे, रासायनिक खते तथा मजुरीत वाढ झाल्याने शेती परवडेनासी झाली आहे. शेतीस जोडधंदा म्हणून भास्कर तरारे यांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचेकडे ४ म्हशीसह काही गुरे-ढोरे आहेत. त्यांना चारण्यासाठी शेतशिवारात ते नेत असत. २९ मे रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी पाळीव जनावरे शेतशिवारात नेली होती. सध्या नवतपा सुरू असल्यामुळे तापमान ४४ अंशापर्यंत गेले असून सूर्य आग ओकत आहे. नेहमीच्या वेळेवर भास्कर सायंकाळचे सुमारास घरी परतला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो शेतशिवारात बेधुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. त्यांला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. पण प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले असून उष्माघातामुळे भास्कर तरारे यांचा मृत्यू झाल्याने शासकीय मदतीस पात्र आहे. शासनाने त्यांचे कुटुंबास आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या