Ticker

6/recent/ticker-posts

लोंखडी गेट पडल्याने ३ वर्षीय मुलांचा दुर्देवी अंत

सचिन चौरसिया चित्रा न्युज

रामटेक:- समोरच्या अंगणात खेळत असतांना अचानक  अंगणात लावलेला लोंखडी गेट पडल्यामुळे त्पा चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पंरतु उपचारादरम्या चिमुकला रोशित यांचा दुर्देवी अंत झाल्याची घटना दि.१५ मे २०२४ ला घडली.
माहीतीनुसार कांद्री- माईन येथील रहवासी विशाल मसराम यांचा मुलगा रोशित विशाल मसराम (३) वर्ष हा आपल्या मित्रा सोबत  समोरील दिपक कठोते यांचाअंगणात खेळत होता. पंरतु अंगणातील लोंखडी गेट पूर्णपणे बदिस्त नसल्यामुळे खेळता- खेळता रोशित हा गेट जवळ गेला असता अचानक त्याचा अंगावर लोंखडी गेट पडले. लोंखडी गेट पडल्यामुळे त्पा चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. परिसरातील रहिवाशांनी रोशित यांच्या अंगावरील गेट उचलुन त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र , मनसर नेण्यात आले. पंरतु डोक्याला गंभीर मार असल्यामुळे उपचारादरम्यान त्या ३ वर्षीय चिमुकला रोशित याचा मृत्यु झाला. चिमुकल्याच्या काळाने घात केल्याने आई- वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या