रुपाली मेश्राम चित्रा न्युज
सोलापूर:-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमा वेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह नॅशनल दलित फॉर जस्टीस संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सतीश शिंदे शैलेश दिवटे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी आकाश गायकवाड विनोद चौगुले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या