Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसाने सोलर प्लेट चे नुकसान

• झरप येथील घटना

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- वर्षातून २ ते ३ वेळा पिके घेऊन आर्थिक उन्नती साधावी. या करिता अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली. वीज बिल परवडत नसल्यामुळे सोलर प्लेटही लावण्यात आले. पण आस्मानी संकटामुळे सोलर प्लेट चे नुकसान झाल्याची घटना मंगळवार(ता.२८मे) सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव संदीप वसंत हेमने, रा. झरप, तालुका लाखनी असे आहे. 
            संदीप हेमने रा. झरप हे अल्पभूधारक शेतकरी असून सामाईक शेतजमीन आहे. त्यात ते धानाचे पीक घेत असत. कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणामुळे पीक पाणी बरोबर येत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचे भरणपोषण करण्याची समस्या निर्माण होत असे. यावर मात करण्यासाठी त्यांनी सिंचनाची व्यवस्था केली व खरीप आणि रब्बीतही पीक घेऊ लागले. पण वीज बिल अधिक येत असल्यामुळे परवडेनासे होत असे. यावर उपाय म्हणून त्यांनी १५ महिन्यापूर्वी शक्ती सोलर पंप बसविले. सर्व व्यवस्थित सुरू असताना मंगळवार(ता.२८मे) सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने संदीप हेमने यांचे शेतातील ५ सोलर प्लेट चे नुकसान झाले आहे. या प्रकाराने ते सिंचन सोयीस मुकणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या