सावंगी वळण रस्त्यावर झाला अपघात
रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-तालुक्यातील सावंगी वळण रस्त्याने दुचाकीवरून शेळी घेऊन जाताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मामा-भाचा ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मोहसीन शफीक कुरेशी- कल्याणकर (३२ वर्षे, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) व सईद मुस्ताक कुरेशी (१६ वर्षे, रा. मंठा, जालना) अशी मृतांची नावे आहेत.
वडोदबाजारच्या आठवडी बाजारात सोमवारी सकाळी मोहसीन शफीक कुरेशी व सईद मुस्ताक कुरेशी हे मामा- भाचे शेळी खरेदीसाठी गेले होते. त्यांनी येथून एक शेळी घेतली. त्यानंतर ते दुचाकीने (एमएच २०, व्ही १००) शेळी घेऊन फुलंब्री मार्गाने सावंगी वळण रस्त्याने चिकलठाणा येथे जात असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना काही वेळात घाटीत दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
0 टिप्पण्या