Ticker

6/recent/ticker-posts

उभ्या ट्रकला मागेहून येणाऱ्या ट्रकची धडक, १ गंभीरभ


• पिंपळगाव/सडक येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- उभ्या ट्रकला मागेहून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने उभा ट्रक चालकाचे पायावरून समोर गेल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी(ता.६) दुपारी ३:३० वाजता दरम्यान घडली. अपघातानंतर जखमीला वैद्यकिय सहाय्यता न पोहचविता ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी ट्रक क्रमांक आरजे १४ जीजी ९४६४ चे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी ट्रक चालकाचे नाव दीपक मधुकर मेमंड(४०) रा. वळकी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा असे आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                   ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ५३१२ चा चालक साकोली कडून भंडारा कडे माल भरून जात असताना पिंपळगाव/सडक येथे सोमवारी दुपारी ३:३० वाजता चे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ चे बाजूला ट्रक लावून ट्रक चे चाकातील खिळे काढत असताना मागेहून येणाऱ्या ट्रक क्रमांक आरजे १४ जीजी ९४६४ चे चालकाने आपले ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला मागेहून धडक दिल्याने जखमीचा ट्रक २० फूट समोर गेल्याने त्या ट्रकचे चाकात जखमीचे पाय गेल्यामुळे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले व डाव्या पायाला जखम झाली. धडक देणाऱ्या ट्रक चालकाने जखमी ट्रक चालाकास वैद्यकिय मदत न पोहचविता घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळाचे आजूबाजूला उपस्थितांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. पोलिस हवालदार दिगंबर तलमले घटनास्थळावर गेले व जखमी ट्रक चालक दीपक मेमंड याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती करण्यात आले. जखमी ट्रक चालकाचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी ट्रक क्रमांक आरजे १४ जीजी ९४६४ चे चालकावर अपराध क्रमांक १८३/२०२४ कलम २७९, ३३८ भादवी तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८४, १३४(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या