कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:लाखनी येथील पीएमश्री जि.प. गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील शिक्षिका सुचिता चोले यांचा शाळेचे मुख्याध्यापक रवी मेश्राम यांचे हस्ते सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्ती हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून जो लोकसेवक पदाचा शेवट आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. सेवानिवृत्ती हा संमिश्र भावनांचा काळ रोमांचक तसाच वेदनादायी आहे. तर प्रेरणादायी व सुखदही आहे. जि.प. गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सुचिता चोले हे व्यक्तिमत्त्व, नम्र तितकेच संवेदनशील आहेत. मन जपणारे, समजून घेणारी, समंजस, सात्विक आहे. विनम्रता, शांतता, कृतज्ञता, विनयता आणि विवेक या गुण वैशिष्ट्यांनी ओतपोत भरलेले आहे. असे मुख्याध्यापक रवी मेश्राम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. सेवानिवृत्तीपर सत्काराला उत्तर देताना सुचिता चोले यांनी सेवा काळात सर्व सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालक सारिका दोनोडे तर आभार राजेश चोले यांनी मानले. यावेळी निश्चय रंगारी, शशी शेंडे, प्रा. आय.बी. चव्हाण, प्रा. व्ही.एम. वैद्य, प्रा. विलास पूर्णे, प्रा. आर. वाय. खोब्रागडे, प्रा. अतुल शेंडे, प्रा. पौर्णिमा भैसारे, प्रा. सायली डोंगरे, प्रा. मेघा धांडे, प्रा. प्रधान, प्रा. मदनकर, मरसकोल्हे, मौदेकर, शिवरकर प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या