Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांना भरघोस मतांनी विजयी करावे...

-- शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे प्रतिपादन

किरण जावळे चित्रा न्युज 
बीड :-स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे बीड जिल्ह्याचे विकास कामांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा त्यांना आजचे मताधिक्य देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला केले आहे आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा सदस्य आमदार बाळासाहेब आजबे असे आम्ही  तिघेही एकत्र आहोत त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीमध्ये नसताना देखील 1 लाख 71 हजार मतांनी डॉ.प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या यावेळी आता बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज नेते महायुतीमध्ये आल्यामुळे मागील निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा यावेळी आणखी कितीमते जास्तीचे वाढविता येतील यासाठी प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. गेवराई तालुक्यातून अमरसिंह पंडित,परळी तालुक्यातून पालकमंत्री  धनंजय मुंडे, माजलगावातून आ.प्रकाश सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी पार्टी हे एकत्र आल्याने त्यांची ताकद किती आहे ? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. मराठा समाजाला महायुती शासनातील मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या मंत्रिमंडळाने विधानसभेमध्ये ठराव पारित करून 10% आरक्षण सरकारने दिले असल्याने सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे यावरून दिसून येत आहे. खतांच्या वाढत्या किमती बाबत बोलताना ते म्हणाले की युक्रेन रशिया युद्धा मुळे देखील कच्च्या मालाच्या किमती कमी-जास्त होत असल्यामुळे खताच्या किमती वाढत आहेत असे सांगत आष्टी तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी गेले वीस वर्ष सत्तेत राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता करत आहेत याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता उल्लेख केला..
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांना 1लाख 71 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते आता या निवडणुकीमध्ये आष्टी मतदारसंघात. 70 ते 75 हजाराची लीड मिळेल. असा आपला राजकीय अंदाज आहे..  त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या