भंडारा:-एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प भंडारा, न. प. द्वारा शहरातील वॉर्डात अंगणवाड्या सुरू असून बहुतांश अंगणवाड्यामध्ये सोयीसुविधाचा अभाव जाणवत आहे.
लाला लजपत राय वॉर्ड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 34 मध्ये 7 मे रोजी मुलांच्या टीकाकरण, लसीकरण करिता मातांनी आपल्या लहान मुलांना घेऊन आले असता तिथे पंखा, व बसण्यासाठी बरोबर बँचेस, खुर्च्या इत्यादी चा अभाव जाणवला. लहान मुलांना लसीकरण करीत आलेल्या त्यांच्या माता व घरच्या सदस्या करिता बाहेर खुर्च्या ,बेंचेस नसल्याने उन्हात त्यांना उभे राहावे लागले .पंख्या अभावी मुलांना लस देता प्रसंगी मातांनी आपल्या साडीच्या पल्लू ने तर पित्यांनी हातात खड्डा घेऊन आपल्या मुलांना हवा करतांना बघण्यात आले. प्रत्येक मुलांच्या मातांनी इथे पंखा का लावण्यात आले नाही ?असा सवाल टीका लावणाऱ्या नर्स ला केला पण यांच्यात नर्स चा काही दोष नाही, अंगणवाडी चा घर मालक बाहेरगावी राहतो ,त्याने वीज बिल न भरल्यामुळे येथील वीज_लाईन कापण्यात आली. तेव्हापासून (२ वर्षांपासुन) येथील वीज व पंखा बंद आहे अशी माहिती मिळाली.पण या कडे संबंधित विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे होते.
सध्या सुट्टी असल्याने अंगणवाडी येथे मुलांचे येणे बंद आहे. येथे नियमित मुलांना पोषण आहार दिले जाते आणि वेळोवेळी आहार सामग्री सुद्धा दिली जात असते परंतु विज, पंखा व इतर साहित्य सुविधा संबंधित विभाग द्वारा तात्काळ उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे ,सोबतच वेळोवेळी आणि दरमहा संपूर्ण अंगणवाडी चे निरीक्षण ,अवलोकन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरिक प्रकल्प तथा नगरपरिषद कडून अत्यावश्यक केले पाहिजे,याबाबत ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन तर्फे नगरपरिषद भंडारा चे मा. मुख्याधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.


0 टिप्पण्या