Ticker

6/recent/ticker-posts

आ. जितेंद्र आव्हाड यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

• खा. सुनील मेंढे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन 

 कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- मनुस्मृती विरोधात महाड येथे आंदोलन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून अवमान केला आहे. त्यांचे विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या करिता भारतीय जनता पार्टीचे वतीने खासदार सुनील मेंढे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. 
                    महाड येथे मनुस्मृती विरोधात आंदोलन करतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून त्यांचा पर्यायाने राष्ट्राचा अपमान केला आहे. हे घृणास्पद कृत्य असून त्यांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारे आहे. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीचे वतीने त्यांचे विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेतला असल्याने भारतीय जनता पार्टी भंडारा चे वतीने गुरुवार(ता.३०मे) रोजी आंदोलन करण्यात आले. शहरातील त्रिमूर्ती चौकात भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तथा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर खासदार सुनील मेंढे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत शासनास निवेदन पाठवून आमदार जितेंद्र आव्हाड यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, सचिन कुंभलकर, रुबी चढ्ढा, नितीन कडव, सूर्यकांत इलमे, मंगेश मेश्राम, रामकुमार गजभिये, आशू गोंडाने यांचेसह भारतीय जनता पार्टीचे महिला व पुरुष, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या