• ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये परिपक्व झालेल्या धानावर रोग आणि किडीचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामात तूट भरून निघेल यामुळे अनेकांनी रब्बी हंगामात रब्बी वानासह उन्हाळी धानाची लागवड केली. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम बुडाला. तसेच धान परिपक्व होण्याचे मार्गावर असताना पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आगमन झाल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाली. त्यामुळे खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना १०० टक्के सबसिडी वर बियाणांची व्यवस्था करावी. अशी मागणी ऍड . सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२३ मध्ये २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे एकंदर क्षेत्रापैकी २१ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ६९८ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड झाल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली होती. खरीप हंगाम २०२३ मध्ये धानाच्या गर्भार अवस्थेपासूनच धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांचे म्हणणे आहे.
रब्बी हंगामात ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कठान मालाची तर ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम पूर्णतः बुडाला. पण उन्हाळी धान पीक अपेक्षेप्रमाणे येईल. असे धान उत्पादकांना वाटत असताना धान परिपक्व होण्याचे मार्गावर असताना पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे धान पिकास फटका बसला. त्यामुळे खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये धान उत्पादकांना बियाणांसाठी पायपीट करावी लागेल. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता शासनाने १०० टक्के सबसिडी वर बि-बियाणे उपलब्ध करावे. अशी मागणी ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे.


0 टिप्पण्या