Ticker

6/recent/ticker-posts

शुकानंद मठा जवळील मोठया तलावाची दुरुस्त करण्याची माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ कळे यांची मागणी


 
 मोईन कादरी हिंगोली

हिंगोली:-वसमत शहरात दोन तलाव आहेत  एक शुकानंद मठाजवळील मोठा तलाव व सोमवार पेठ मधील छोटा तलाव या दोन्ही तलावांनी वसमत शहरातील बोअर चे पाणी यापूर्वी कमी होऊ दिले नव्हते परंतू आता दोन्ही तलावा पैकी छोटा तलावात भर टाकुण जागा विकणे सुरू आहे. कृत्रीम आपत्ती मुळे नामशेष तर मोठा तलाव नैसर्गीक आपत्ती मूळे त्याच्या भिंतीला भगदाड पडुन त्या परिसरातील घरात पाणी घुसुन विध्वंस झाला होता त्यामूळे पाण्याचे तळे कोरडे झाल्याने सर्वाचे पाण्याचे बोअर कोरडे होऊन पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. आता पावसाळा सुरू होण्याचे संकेत हवामान खात्याने दिलेले असुन मोठया तलावाची दुरूस्ती होणे अत्यावश्यक आहे . याबाबत चे निवेदन वसमत माजी नगराध्यक्ष इंजि. श्री सुनील भाऊ बाबुराव काळे शिवसेना सह संपर्कप्रमुख यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. 
  सध्या मोठया तलावात पाणी साठवण होण्यासाठी सर्व संरक्षण भिंतीचे दुरूस्ती व तलावातील गाळ काढून खोलीकरण पावसाळ्यापूर्वी करूण या परिसरातील जनतेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी इंजि' सुनिलभाऊ काळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या