अमोल सरोदे यांचे उत्स्फूर्त स्वागत करून गावो गावी प्रचारांला प्रतिसाद
किरण जावळे चित्रा न्युज
बीड लोकसभा राष्ट्रवादी क्राॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ कडा गटांचे गटप्रमुख अमोल दादा सरोदे हे सध्या आष्टी मतदारसंघात गाव,वाडी,वस्ती,तांडा इथपर्यंत मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत..यामध्ये अमोल दादा सरोदे हे गावातील प्रत्येक मतदारांशी संवाद साधताना पहावयास मिळत होते,तसेच सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला हा दौरा रात्री सात वाजेपर्यंत अविरतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. यामध्ये गावो गावी अमोल दादा सरोदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पहावयास मिळत होता.
या वेळी अमोल दादा सरोदे यांच्या गावोगावी झालेल्या प्रचार दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना तुंतारी फुंकणारा माणुस या चिन्हा समोरील जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करत विनंती केली.
दिवसभर बुधवारी फत्तेवडगांव,चिंचाळा,बेलगाव,पाटणसांगवी,चोभानिमगांव,देवळाली,घाटाप्रिंपी,धिर्डी,नांदा,शिराळ,या गावांना गाव दौरा करत प्रचार केला
आदींसह सर्व गावा सर्व प्रचारादरम्यान गाव भेटीतील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या