विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-विविध प्रकारचे कायदे,नियम व अटी हे लातुर,उदगीर,अहमदपुर,निलंगा या सारख्या शहरी भागासाठी आहेत. म्हणुनच उदगीर तालुक्यातील हाळी - हंडरगुळी या गावात मिसरुडं ही न फुटलेली बालके धुम स्टाईल बाईक चालविताना दिसतात.आणि आजवर प्रशासनाने कारवाई करायचे धाडस दाखविले नसल्याने ट्रिपल व चोबल सिट बसवुन विना नंबरच्या तसेच मुदतबाह्य झालेल्या बाईक्स फटाका सायलंन्सर वाजवित गल्लीबोळात व राज्य मार्गावर धुम स्टाईल नाबालक मंडळी पळविताना दिसतात.आणी पुण्यासारखी दुर्देवी घटना घडल्या - वरच संबंधित अधिकारी कारवाहीचा बुलडोझर चालविणार का ? तसेच सर्व प्रकारचे कायदे व त्याचा वापर करण्याचे अधिकार हे फक्त शहरी भागासाठीच मर्यादीत आहेत का ? असे प्रश्न अशा वाहनधारकांमुळे हैराण झालेले हाळी- हंडरगुळीत चर्चीले जात आहे.तसेच अशा वाहन चालकांवर कारवाई नाही केल्यास पुण्यासारखी दुर्देवी घटना घडू शकते.
देशात नविन मोटार वाहन कायद्या - सह अन्य कायदे लागु झाले असुन, या कायद्याचा वापर हा गल्लीपासुन दिल्ली पर्यंत करण्याचा अधिकार हा संबंधित प्रशासनाला आहेत.माञ नांदेड-बिदर या राज्यमार्गालगत असलेल्या तसेच उदगीर नंतर उदगीर तालुक्यात सर्वात मोठी बाजार पेठ व लोकसंख्या असलेल्या तसेच भावी तालुका म्हणुन ओळखले जाणा-या हाळी-हंडरगुळी या 2 गावात विविध प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी संबंधितांकडून होताना दिसत नाही. म्हणुन कायद्याच्या आयचा घो ! असे म्हणत नियम,कायदा पायदळी तुडव- णारी गॅंगच निर्माण झाली असुन,या गावात सर्रासपणे नाबालक असलेले शेकडो पोरं ट्रिपल,चोबल सिट बसुन फटाका सायलंन्सर वाजवित बाईक धुम स्टाईल चालविताना दिसतात.व आजवर कुणीच कारवाही करण्याचे धाडस दाखविले नसल्याने विनानंबर व मुदतबाह्य गाड्या बिनबोभाटपणे या रोडवर धावताना दिसतात.तसेच या अशा बाईक चालकांना ट्रीपल व चोबल सिट्स बाईक चालवण्याचा परवाना दिला कुणी.आणि यातील एखाद-दुसरी गाडी चोरीची असु शकते.अशी चर्चा हाळीत होतेय. अशा वाहनधारकांवर कारवाई केली जाईल.असे आश्वासन कांही महिण्या पुर्वी शांतता समितीच्या बैठकीत स. पो.नी.भिमराव गायकवाड यांनी दिले होते.पण अद्याप एकावरही कारवाई झाली नाही.यामुळे सर्व कायदे,नियम हे फक्त शहरी भागासाठीच आहेत का.नसतील तर मग येथील वाहन- धारकांवर कारवाई कधी करणार ? एखादा मोठा अपघात झाल्यावर का. यासारखे प्रश्न शांतता समितीच्या त्या बैठकीत उपस्थित असलेल्या कांही मान्यवरातुन उपस्थित केले जातात. तेंव्हा या ठिकाणी पुणे,मुंबई सारखी हिट अॅन्ड रण , ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरीत अॅक्शन घ्यावी.अशी मागणी जनता व व्यापारी बांधवातुन जोर धरत आहे


0 टिप्पण्या