हाळी-हंडरगुळीकर बसले आशेवर.
विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असुन बळीराजा पेरणीसाठी तयारी करण्यात मग्न झाला आहे.माञ गत वर्षीचा विमा अद्यापही बॅंक खात्यात जमा झाला नाही.यामुळे जुन २०२४ पर्यंत तरी विमा हाती पडावा.अशी आशा हाळी-हंडरगुळीतील शेतकरी बाळगुन आहेत.
गत वर्षी अत्यअल्प पाऊस झाल्याने खरीब व रब्बी हे 2 ही हंगाम वाया गेले होते.आणि नमो शासनाने जाहीर केल्यानुसार 1 रुपयात पिकांचा विमा काढला.माञ अद्याप पर्यंत विमाच्या छदामही हाती लागला नसल्यामुळे हा रुपयाचा विमा पाॅलिसी निवडणुक ड्रामा तर नव्हता ना.अशी कुजबूज या भागात ऐकू येत आहे.आणि हा ड्रामा नसेल तर मग विमा मिळनार कधी.या कडे आर्थीक संकटातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे.विम्यासह गरजू शेतक-यांना पिक कर्ज ही मिळत नसल्याने नाविलाजास्तव खाजगी अवैध सावकारांचे उंबरठे झिझवावे लागते.आणि आमची नड बघून हाळीतील कांही खाजगी अवैध सावकारी करणारे लोकं बिच्चा-या शेतक-यासह जनतेला अव्वाच्या - सव्वा व्याज घेऊन कच्चे खातात. अशी हाळीत जनता चर्चा करतात.
लातुर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन 25 % अग्रीम रक्कम अनेक गावातील शेतक-यांना मिळाली.माञ येथील शेतक-यांना ना विमा मिळाला ना अग्रीम रक्कम.तसेच हे सर्व कमी म्हणुन की काय फेब्रुवारी - २४ पासुन अनेकदा पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई पण मिळाली नाही.यामुळे ही 2 गावं लातुर जिल्ह्यात आहेत का नाहीत.अशी चर्चा संतप्त शेतकरीवर्ग करित असताना ऐकू येते.
यंदाच्या मान्सुनची चाहूल लागण्या- पुर्वीच शेती मशागतीसह पेरणीसाठी शेतकरी तयार झाला आहे.माञ अति अत्यल्प जमीन असलेल्यांना पेरणी करण्यासाठी पेशांची चणचण आहे. म्हणुन गतवर्षीच्या पिक विम्यासह अग्रीमची रक्कम खात्यावर पडणार कधी.आणि ही रक्कम हाती लवकर पडली नाही तर मग नाविलाजास्तव खाजगी अवैध सावकाराकडे जावे लागणार.आणि मग सावकार मंडळी बिच्चा-या शेतक-यांना बेभावाने पैसे देऊन कच्चे खाणार.अशी चर्चा हाळी या गावात हळू आवाजात ऐकू येते.व गरजु शेतक-यांना ना बॅंक पीक कर्ज देतात.ना शासनकर्ते मदत करतात.या मुळे नाविलाजास्तव बहूतांश *राजांना* आपला *बळी* द्यावा लागतो.ही सत्यता नाकारता येत नाही.तेंव्हा खरीपाच्या तोंडावर तरी अग्रीमसह विम्याची रक्कम खात्यात जमा होईल का.व यासाठी कोणत्या पार्टीचा तालुकाध्यक्ष लक्ष देणार ? असा प्रश्न या निमित्ताने शेतकरीबंधू मधून विचारला जात आहे..


0 टिप्पण्या