Ticker

6/recent/ticker-posts

मरणोत्तर करा संकल्प, अनमोल नेत्र दानाचा

निलागोंदी येथील नृपराज हटवार यांनी केले मरणोत्तर नेत्रदान !

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:-आपल्या संस्कृतीत स्वार्थत्याग करून गरजूंना केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, एक दान असंही आहे, जे मृत्यूनंतर करता येतं. होय, नेत्रदान! वर्षाकाठी राज्यात हजारो नागरिकांना नेत्ररोपणांची गरज असताना, नेत्रदानाच्या अल्प प्रमाणामुळे अवघ्या मोजक्याच शस्त्रक्रिया केले जाते त्यामुळे नेत्रदान हे संपूर्ण जगातून व्हावे आणि एकही अंध नेत्रहीन राहू नये, उद्देश साधून लाखनी तालुक्यातील निलागोंदी येथील एका लहानश्या कुटुंबात राहणाऱ्या नृपराज रतीराम हटवार (वय 49) यांनी नेत्रदानाचा संकल्प करून मरणोपरांत नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला त्यांना पत्नी व एक मुलगी आहे. आज जगात अंध लोकांची संख्या खूप आहे. जर प्रत्येकाने मृत्यूनंतर नेत्रदान केले, तर एकही अंध नेत्राशिवाय राहणार नाही. नेत्रांचे महत्त्व हे अंधांनाच माहीत. नेत्र नसल्याने समाजात होणारी अवहेलना, दुसऱ्यावर अवलंबून राहणे, जगातील सृष्टीसौंदर्यास मुकणे, हे त्यांच्या नशिबी येते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचे महत्त्व समजून घ्यावे. वयाच्या आठ ते दहा वर्षांपर्यंतच्या कोणत्याही वयाचे स्त्री व पुरुष चष्मा असला तरी किंवा नेत्रांचे ऑपरेशन झालेले असले तरी नेत्रदानाचा संकल्प करू शकतात. फक्त त्या व्यक्ती दुर्जन आजार पासून मुक्त असावेत. म्हणून प्रत्येकाने महत्त्व लक्षात घेऊन हे अनमोल नेत्र नष्ट न करता "मरावे परी नेत्ररूपी उरावे' या म्हणीप्रमाणे नेत्रदानाचा संकल्प करावा.आपल्या मृत्यूनंतर गरजू नेत्रहिनांना जग बघता येईल.  नृपराजच्या ह्या कृत्याचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या