कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा ७०वा जन्मदिवस शुक्रवार(ता.१०) रोजी लाखनी तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे, प्रमुख अतिथी युवा आघाडी तालुकाध्यक्ष नेहाल कांबळे, महिला आघाडी तालुका महासचिव चेतना मेश्राम, लोकशाहीर अंबादास नागदेवे, सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य आशिष खोब्रागडे, रवींद्र मेश्राम, अशोक गजभिये, विवेक मेश्राम, रक्षानंद नंदागवळी यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. मान्यवरांचे हस्ते केक कापून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना दीर्घायुष्याच्या मंगल कामना देण्यात आल्या. वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव प्रयत्नशील असून समतेचे राज्य प्रस्थापित व्हावे. त्याच प्रमाणे संविधान रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रोशन खोब्रागडे, तर आभार आशिष खोब्रागडे यांनी मानले. यावेळी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे वतीने फळं वितरण करण्यात आले.


0 टिप्पण्या