Ticker

6/recent/ticker-posts

सत्ता परिवर्तन करण्यासाठी महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-किशोर भोले


किरण जावळे चित्रा न्युज 
 बीड/गेवराई-देशाचे स्वाभिमानी नेते बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ माने कॉम्प्लेक्स पारस नगरी बीड येथे  सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले असून गेवराई तालुक्यातील सर्व महिला ज्येष्ठ युवक तरुण तथा सर्व बहुजन बांधवांनी सभेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे या ऐतिहासिक महासभेस आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार असून देशाचे संविधान वाचवण्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी अशोक हिंगे पाटील यांना संसदेत पाठवण्यासाठी होत असलेल्या महासभेस अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहावे यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या