रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-बोलणे बंद करण्याचा राग आल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने, आईसोबत जात असलेल्या युवतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी जिन्सी पोलिस ठाण्यात घडली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तरुणाला वर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. इम्तियाज खान मेहबूब खान (२४, रा. निजामगंज कॉलनी) असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
२० वर्षीय प्रियांका (नाव बदलले आहे) व इम्तियाज एकाच परिसरात राहत होते. काही महिन्यांपूर्वी प्रियांकाचे कुटुंब दुसऱ्या परिसरात स्थायिक झाले. इम्तियाजसोबतच्या मैत्रीबाबत तिच्या घरच्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे प्रियांकाने त्याच्यासोबत संपर्क कमी केला होता. पण तो सातत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता.
साखरपुडा झाल्याचे कळताच संताप अनावर
• प्रियांकाचा नुकताच साखरपुडा झाला. हे इम्तियाजला समजताच त्याने २० दिवसांपासून तिच्या घरासमोर चकरा मारणे, पाठलाग करणे सुरू केले. बुधवारी प्रियांका आईसोबत काबरा हॉस्पिटलसमोरून जात असताना इम्तियाजने अचानक त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ सुरू केली व चाकूहल्ला केला.
त्यानंतर इम्तियाजने स्वतःच्या • हातावरही वार करून धमकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांची गर्दी होत असल्याने त्याने पोबारा केला. घटना कळताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक गाडे यांनी धाव घेतली. रात्री इम्तियाजला अटक केली.


0 टिप्पण्या