Ticker

6/recent/ticker-posts

नवनित महाविद्यालय खमारी (बुज.) चे सुयश

      
रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
भंडारा :-मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या महाविद्यालयाचा मार्च २०२४ कला शाखा परीक्षेचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ९१.३०% असून या परीक्षेसाठी बसलेल्या ४६ विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत, ३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून गुणानुक्रमे यश संपादन करणारे विद्यार्थी आनंद कुमार दमाहे ७४.१७%, कु. पुण्यश्वरी रूपचंद बंधाटे ७४.१७%,  कु. सोनाली सहादेव बंधाटे ७४.१७% यांनी गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. विक्की अनिल दमाहे हा ७३.८३% गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कु. खुशबू गेंदलाल दमाहे ही ७२.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष किसनजी गजभिये, संस्था सचिव हिरालाल गजभिये, प्राचार्य नरेंद्र गणविर, नानाजी गजभिये, अरुण कांबळे, दिनदयाल दमाहे, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या