संघदीप मेश्राम चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-हॉटेल बंद झाल्यानंतर दोन गुंडांनी प्रवेश करून सुरक्षारक्षकाचे हात पाय व तोंड बांधून ९ मोबाइल व २ लाखांची रोख रक्कम लुटून नेली. रविवारी मध्यरात्री १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास पडेगाव रस्त्यावरील हॉटेल वुडलॉटमध्ये ही घटना घडली.
रोहित शिवाजी पाटील यांचे हे हॉटेल आहे. ५ मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे सर्व हॉटेल बंद झाल्यानंतर सुरक्षारक्षक शंकर आत झोपी गेले. त्याच दरम्यान दोन गुंडांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. शंकर यांना मारहाण करून हातपाय, तोंड बांधले. एकाने त्यांना बंदूकसदृश्य हत्यार दाखवून चिकटपट्टीने तोंड बांधून काउंटर फोडले. त्यातील २ ते २.५ लाख रुपये रोख लुटून नेले, शिवाय हॉटेलमधील कामासाठी ठेवलेले १० मोबाइलही घेऊन पोबारा केला. गुंडांनी पोबारा केल्यानंतर शंकर यांनी स्वतःशी सुटका करून रस्त्यावर येत जवळील व्यावसायिकांना ही बाब कळविली. त्यानंतर, पोलिसांनी धाव घेतली. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या