Ticker

6/recent/ticker-posts

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आष्टीत जाहीर सभा मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - मा.आ.भिमरावजी धोंडे


पंकजाताईं मुंडे,रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांची राहणार उपस्थिती 

किरण जावळे चित्रा न्युज 
बीड/आष्टी-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आष्टीत दि.९ मे रोजी जाहीर सभा होणार असून आष्टी विधानसभा मतदारसंघातील बहाद्दर मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आष्टी विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी केले आहे.पुढे बोलताना मा.आ.धोंडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मतदारांचा व नागरीकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत असून त्यांचा विजय निश्चित आहे.त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत.जिल्ह्याच्या विकासासाठी व ऊस तोडणारा नाही तर ऊस पिकवणारा जिल्हा व तरुणांना रोजगार देणारा जिल्हा ओळख निर्माण करून देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना बहाद्दर मतदार बांधवांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे आज दि.९ मे रोजी आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार असून भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे, रासप नेते महादेवजी जानकर, राजेंद्र म्हस्के, तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के भाजप महायुतीच्या मित्र पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.तरी आष्टी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा.आ.भिमराव धोंडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या