Ticker

6/recent/ticker-posts

वणा नागरिक सहकारी बँक लिमिटेड भद्रावती शाखेचे उदघाटन


 
राजेश येसेकर भद्रावती


भद्रावती : दि. ३१ मे ला वणा नागरिक सहकारी बँक लिमिटेड शाखा भद्रावती यांचे उद्घाटन सोहळा पारपडले या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी खासदार नरेशबाबुजी पुगलीया, आमदार रणजित काबळे, आनंद नागरी बॅकेचे दिपकजी पारेख, माजी बाधंकाम सभापती जि. प. चंद्रपुर  तथा जेष्ठ नेते श्री. प्रकाशबाबुजी मुथा, वणा बॅकेचे सर्वेसर्व सुधीर बाबुजी कोठारी, हिंगणघाटचे माजी आमदार राजुभाऊ तिमाडे, समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर, चंद्रपुर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकभाऊ नागापुरे, देवेंद्र बेले, भद्रावती बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर डुकरे, राजु आसुटकर, ॲड उदय पलिकुडवार व बालु गुंडावार यादी सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बॅंके तर्फे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्यासह मान्यवराचा सत्कार करण्यात आला. वणा बॅंकेच्या या नवव्या शाखेचे भद्रावती येथे आज उदघाटन झाले. याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी  वणा बँकेचे सर्व संचालक मंडळ त्यांचे मनपुर्वक अभिनंदन करतो व भविष्याच्या वाटचाली करीता वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनता जनार्दन  तसेच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या