Ticker

6/recent/ticker-posts

आमदार प्रतापदादा अडसड यांच्या उपस्थितीत उपोषण मागे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :- जिल्हातील  तळेगाव दशासर येथील ग्रामस्थ श्री.अशोकजी धनजोडे, श्री.शंकररावजी शेलोकार, श्री.रमेशरावजी ठवकर, श्री.पुंडलिकरावजी बाबरे, श्री.शंकररावजी शिरभाते, श्री.अविशभाऊ कावळे, श्री.संजयभाऊ साळवे, श्री.अमर भाऊ सुरझुसे हे घरकुल, सिंचन, विहिरी, स्वच्छ भारत मिशन टप्पा १ या योजनांचे फिजिकल व स्ट्रक्चर ऑडिट करून दोषींवर कार्यवाही करण्यासंदर्भात व इतरत्र रास्त मागण्यांकरिता चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याशी संपर्क करून तातडीने गावकऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण करण्या संदर्भात चर्चा करून आमदार प्रतापदादा अडसड यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेत हे उपोषण मागे घेण्यात आले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या