चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : येथील सुप्रसिद्ध व्यापारी हर्षकुमार दिपचंद फडे यांचे नातू राजवीर निकेत फडे याने वर्ल्ड माइंड स्पोर्ट्स चॅम्पियन शिपमध्ये विजेतेपद पटकावले.
दुबई येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित वर्ल्ड माइंड स्पोर्ट्स चॅम्पियन शिपमध्ये हर्षकुमार फडे यांचे नातू, बारामती येथील निकेत फडे यांचे चिरंजीव आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी राजवीर निकेत फडे याने गटात विजेतेपद पटकावले.
राजवीरने ऑडिटरी मॅथ या गटात अत्यंत प्रभावी सादरीकरण करीत चॅम्पियनचा किताब मिळवला. राजवीरने जागतिक स्तरावर भारताला गौरव मिळवून दिला आहे,
ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे जिनिअस किडचे संस्थापक युसेबियस नोरोन्हा यांनी सांगितले. राजवीरच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या कर्तृत्वाचा नावलौकिक आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजवीरवरच्या शाळेत, शिक्षक आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या