Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय सिलंबम(लाठी काठी ) कॅम्प 15 जुन ला भद्रावती मधे



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : सिलांबम म्हणजे - लाठीकाठि, तलवार,दांड पट्टा, सरुल,यांचा वापर करून 13 स्पर्धा प्रकारात खेळला जाणारा खेलो इंडिया -  भारत सरकार , स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारमपारिक युद्ध कला खेळ- भारतीय संस्कृती चे जतन व प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुध मल्टिपर्पज अमेचुअर स्पोर्टस् अकादमी, भद्रावती द्वारा एक दिवसीय जिल्हास्तरीय सिलंबम ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
 
आयुषी स्पोर्ट्स अकादमी, भद्रावती, चंद्रपुरच्या पुढाकाराने दिनांक 15 जुन 2025 सकाळी 08 ते दुपारी 05 पर्यंत अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्मानी चांदा वसाहत, भद्रावती, चंद्रपुर येथे या ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्प दरम्यान विदर्भ विभागातील कोचेस करिता विदर्भ विभाग प्रमुख व सिलंबम खेळाचे प्रशिक्षण सुरू करणारे जिह्यातील मार्शल आर्ट्स एक्सपर्ट मास्टर दुर्गराज रामटेके यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख मार्गदर्शनात स्टेट लेव्हल सिलंबम रेफरी कोर्सला ट्रेनिंग देण्याकरिता मुख्य कोच म्हणून मास्टर संजय बनसोडे सर,इंटरनॅशनल एक्सपर्ट सिलंबम कोच,रेफरी,जज,पुणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात 2008 पासुन सर्वप्रथम सिलंबम क्रीडा प्रकाराचे सर्व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू करणारे एकमात्र सिनियर सिलंबम एक्सपर्ट मास्टर संजय बनसोडे सर हे सिलंबम स्पोर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
 
तेव्हा जिल्ह्यातील सर्व इंटरेस्टिंग शालेय व महाविद्यालयिन स्टुडंट्सनी तसेच 06 वर्षा वरील तर 60 वर्ष पर्यंत सर्व इंटरेस्टिंग स्त्री पुरुष या सुवर्ण संधीचां लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशनचे पदाधिकारी सौ शीतल रामटेके, बी एल करमनकर, राकेश राय, प्राविण्य पाथर्डे, करण डोंगरे,अशोक कामडे, सौ शुभांगी डोंगरावर, सौ प्रगती कथडे, सुरेंद्र सिंग चंदेल, आशिष चहारे, संदीप पंधरे, दीक्षांत रामटेके, सिनु रामटेके, सुनील गायकवाड,संजय माटे,शंभु वाघमारे, गौतम भगत, तन्नू आडे, नियाशा शाहु महेक शेख यांनी केले आहे. कॅम्प विषयी सविस्तर माहिती करीता मोबाईल - 9067758618 यावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या