Ticker

6/recent/ticker-posts

क्रिडो बेंगलोर लिटल चॅम्प्स प्री स्कूल करमळ्यातील शिक्षण परिवर्तन घडवणार..प्राध्यापक अंजली श्रीवास्तव


लिटल चॅम्प प्री स्कूल चा उदघाट्न सोहळा संपन्न!!!!

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-करमाळा शहरामध्ये प्रथमच बेंगलोर क्रिडो लिटल चॅम्प प्री स्कूल बाल मानसशास्त्र तज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम आणि क्रिडो लॅब युक्त अशी ही कृतीतून, प्रायोगिक शिक्षण देणारी ही पूर्व प्राथमिक शाळा करमाळ्यामध्ये सुरू करण्याचे काम काही महिन्यापासून सुरू होते. हे काम पूर्णत्वास आले आणि दिनांक 11 जून रोजी लिटिल चॅम्प प्री स्कूल चा उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

 या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी 
 सुनीता वाशिबेकर ( माजी. नागराध्यक्ष)
अॅड. सविता शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या)
अंजली श्रीवास्तव (समाजसेविका, साहितीक)
 माधुरी परदेशी (अखिल भारतीय ग्राहक मंच)
डॉ. सुनिता दोशी, डॉ. निशासारंगकर,डॉ. मंजिरी नेटके,अॅड. रागिनी कोंगेसौ. ज्योतीमुथ्था (मुथ्था अॅबाकस) रुपाली दिपक पाटणेसौ. विद्याताई चिवटे (मा. नगराध्यक्षा. कनप)
 ईब्राहिम मुजावर (सनराइज इंग्लिश क्लासेस)
ज्योती विधाते (विधाते क्लासेस) कोमल सोळंकी (डी.एम.एल.टी. कल्संटंट)सौ. चंद्रकला मारकड (उद्योजक).सौ. जनार्धन पवार (यशवंत क्लासेस)सौ. मनिशा करचे (प्रथमेश क्लासेस)सौ. मंदाकिणी  चिवटेसौ. अपर्णा  चिवटेसौ. मेघना चिवटेसौ ऋतुजा चिवटेसौ. रुपालीताई राजेभोसलेसौ. रुपाली पाटणेसौ अश्विनी चिवटेसौ.सुवर्णा कोरे सौ.शिल्पा निंबाळकर,सौ. मंजू देवी सौ. रजनी सळुंखेसौ.सलिमा मुलानीसौ. इर्शाद मुजावर 
बोरा भाभी,कटारिया भाभी,नेटके ताई,चिवटे ताई ,   मॅडम,ढाळे ताई, हवालदार ताई,विद्या एकतपुरे,महिमा असादे, लुंकडं भाभी,  लांडगे ताई हे सर्व उपस्थित होते तसेच करमाळ्यातील चिकित्सकृतीत असणारे अनेक पालकही उपस्थित होते.
 या कार्यक्रमाची सुरुवात शैक्षणिक चर्चेने झाली या चर्चेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी सहभागी होत्या.

 या कार्यक्रमांमध्ये क्रिडो नेमकं काय आहे.? क्रीडा कशा पद्धतीने काम करतं? तसेच क्रीडो मधील विविध शैक्षणिक साहित्याचा वापर अगदी सुलभ गतीने करून अभ्यासक्रमातील अवघडातील अवघड असणाऱ्या  संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने कशा समजून घेता येतील. याबद्दल माहिती देण्याकरता क्रीडो स्टाफ पाठवण्यात आला त्यामध्ये सौरभ जाधव सर यांनी सर्व पालकांना तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांना  क्रीडो चा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले.  विविध पालकांनी तसेच पाहुण्यांनी लॅब मधील विविध साहित्यांबद्दल प्रश्न केले सौरभ सरांनी त्या सर्व प्रश्नांचे निरसन देखील केले.

 सौ असादे मॅडम यांनी ही शाळा सुरू करण्यामागची कारणे तसेच क्रिडो ची निवड का केली याची माहिती सर्वाना दिली. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये देखील बदल करणे कृतीतून शिक्षण आकलन ही चांगली वाढते याबद्दलही त्यांनी जागृत केले.
 कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या तज्ञ मंडळींनी सुद्धा आपली शाळेबद्दलची मते व्यक्त केली.
 पवार सर यांनी शाळेतील शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य भौतिक सुविधा चे कौतुक केले तसेच विशेष इंग्रजी विषयाच्या शिक्षणाबद्दल आपले मत व्यक्त केले. 
 मुजावर सर यांनी शाळेची लॅब  पाहता शाळेचे खूप कौतुक केले एखादी गोष्ट शिकणे म्हणजे फक्त त्याबद्दल लिहिता येणे नव्हे प्रॅक्टिकली ती गोष्ट करता ही आली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी मार्कच महत्वाचे नव्हेत विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलप होणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ते या लॅबच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
 अंजली श्रीवास्तव मॅडम अशा पद्धतीची करमाळ्यातील शिक्षणाची परिस्थिती बदलणारी ठरणार ही शिक्षण पद्धती करमाळ्यामध्ये उपलब्ध करून दिल्या कारणाने यांचे देखील खूप कौतुक केले.
 एडवोकेट सविता शिंदे मॅडम यांनी देखील पालक तसेच विद्यार्थी शिक्षक यांना त्याच्या शिक्षण पद्धती बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले तसेच शाळा पाहून शाळेचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 
 डॉक्टर सुनिता दोशी म्हणल्या कृतीयुक्त शिक्षण देणारी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणारी क्रिडो लॅब एक उत्तम माध्यम बनेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.
 डॉक्टर निशा सारंगकर शाळेचा अभ्यासक्रम तसेच शाळेची भौतिक व्यवस्था व काही पाहून शाळेचे कौतुक केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 सौ मंजुश्री मुसळे यांनी क्रीडो पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा कसा आहे. क्रीडोच वेगळं पण काय आहे. शैक्षणिक साहित्य आणि अभ्यासक्रम याची सांगड कशा पद्धतीने घातली आहे. याबद्दल मार्गदर्शन केले. 
 या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच आई कमला भवानीच्या प्रतिमेची पूजन प्रमुख पाहुण्यांनी केले. फीत कापून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
 यानंतर अल्पोपहार झाल्यानंतर कार्यक्रम संपण्यापूर्वी उपस्थितांचे अभिप्राय हे अभिप्राय वॉल वर घेण्यात आले..
 या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ असादे मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या