चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी
व्हायटर लावून, खाडाखोड करून, सही व शिक्के खोडून, नकली शिक्के व सही करवून, बोगस पद्धतीने फेरफार करून नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या व महारवतन,ईनामी,सरकारी,गायचरण, राम मंदिराच्या जमिनी हडप केल्या आहेत, असा आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई व्हावी,म्हणून आदिवासी संघटनांकडून शहादा बंद ठेवून, काळे झेंडे दाखवून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी जोर धरत आहे.
जमिनीच्या नोंदीत फेरफार वर व्हायटर लावता येत नाहीत, खाडाखोड करता येत नाहीत, असा नियम असतांना चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी ह्या जमिनी स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कशा करून घेतल्या?असा सवाल उपस्थित केला आहे.आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावावर होत नाही, असा कायदा असतांना,माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतांना ह्या जमिनी अशा बोगसगिरीने चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केल्या आहेत.
नंदूरबार जिल्ह्य़ातील दुधाळे गांवातील जमीन व्हायटर लावून खाडाखोड करून फेरफार केल्याचा पुरावा सापडला आहे.व्हायटर लावलेला हा जमिनीचा मोठा बोगस पुरावा आहे.चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात मी वन टू वन भेटून पत्रकारांसमोर जमिनीचे पुरावे दाखवायला तयार आहे,असे भाषणात म्हटले होते.त्यांचे वन टूर वन चे आवाहन स्वीकारून आम्ही दिनांक १३ जून २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे.त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आम्ही आरोप करीत असलेले जमिनीचे पुरावे आणावेत, असे आवाहन नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी संघटनांनी केले आहे.शहादा येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत रघुवंशी जमिनीचे पुरावे घेऊन येतील का? की पत्रकारांसमोर येणारच नाही,याकडे नंदूरबार जिल्ह्य़ातील जनतेचे लक्ष लागून आहे.
0 टिप्पण्या